बसल्या बसल्या मनात एक विचार घोळू लागला....मन क्षणभर त्याचाच वि चार करू लागले..आयुष्यात खूप काही मिळतं...खूप काही गवसतं.. कित्येक माणसं भेटतात..पण ती चांगली की वाईट हे मात्र आपल्यावर अवलंबून असतं.. श्रीकांत... the Name of Lord Krishna ...लहान भाऊ..पण त्याचे विचार अगदी मोठ्या सारखे .. त्याच्याकडून खूप काही शिकलो.. वयाच्या १३-१४ व्या वर्षी हातात वही पेन घेऊन कविता करत बसायचा..सतत काहीतरी वाचत रहायचा..आयुष्य भरात कोणी जितकं पुण्य कमवलं नसेल तितकं तो त्याच्या लहानश्या आयुष्यात कमवून गेलाय....गेलाय कुठे..जवळच आहे..आमच्या आसपास आहे..जातो तो फक्त देह..जो कधी न कधी तरी जाणारच असतो..
स्वतःच्या कवितांचा पुस्तक publish करायचा त्याचा स्वप्नं होतं..आम्ही ते पूर्ण करू..आता तर हि फक्त सुरुवात आहे..
मला खूप लिहायचंय..त्यासाठी काहीपण करेन..असाच त्याचा दृष्टीकोन होता..आपलं ध्येय साध्य करायचं होतं त्याला..
आता तो क्षण आलाय..वाटत उठाव आणि आभाळालाही सांगावा..
तो क्षण आलाय..
त्यामधला आनंद....
न कोणीही अडवणारा..न कोणी थांबवणारा..
वाटतं सगळ्यांना सांगावं..
आज मनासारखा झालंय..
कुठलीतरी गोष्ट सुख देऊन गेलीये..
कदाचित त्याला कळला ही असेल तो आनंद..
त्याच्या स्वप्नांची सुरुवात आता होतेय..
नेहमी दुसऱ्यांसाठी काहीतरी करणारा...
आज आम्ही त्याच्या साठी काहीतरी करतोय..
एक वेगळंच सुख मनाला दिलासा देताय..


very good thinks i will always wid u dear....
ReplyDeletewe will publish Papuu's book 1 day.........
it's my confidence...........